माळी समाजाचा 25 डिसेंबरला जळगावात वधू-वर परीचय मेळावा
Bride and Groom Parichay Mela on 25th December in Jalgaon वरणगाव : महाराष्ट्र माळी समाज महासंघ, जळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित माळी समाजाचा वधू-वर परीचय मेळावा 25 डिसेंबर रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी भुसावळ तालुक्याची माळी समाजाची नियोजन बैठक रविवारी वरणगाव शहरात घेण्यात आली. या बैठकीत आगामी 25 डिसेंबरला जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह सभागृहात मेळावा घेण्याचे ठरले.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, राज्य कार्याध्यक्ष डॉ.नलीन महाजन, जिल्हाध्यक्ष शाम महाजन, जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, माळी समाज अध्यक्ष संजय माळी, सुभाष माळी, जिल्हा संघटक प्रल्हाद माळी, तालुकाध्यक्ष विजय माळी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील माळी समाजातील उपवर वधू-वर यांच्या पालकांनी परीचय पत्रक निलेश माळी (भुसावळ), अनुप माळी (दीपनगर), संतोष माळी, संजय माळी, सुभाष माळी, प्रल्हाद माळी, विजय माळी (वरणगाव) यांच्याकडे परीचय फॉर्म उपलब्ध असून 5 डिसेंबरपर्यंत परीचय पत्रक भरून द्यावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी यांनी केले आहे.

