जळगावातील ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल नेवे यांचे हृदयविकाराने निधन : उद्या अंत्ययात्रा


Veteran journalist Chandulal Neve dies of heart attack : Funeral tomorrow जळगाव : ‘दैनिक तरुण भारत’चे माजी निवासी संपादक व ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल देविदास नेवे (68) यांचे मंगळवार, 15 रोजी रात्री 11 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अयोध्या येथे निधन झाले. एक व्यासंगी व अभ्यासू पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले चंदुलाल नेवे हे मूळचे यावल तालुक्यातील साकळी येथील रहिवासी होते. ते नुकतेच नेपाळ व उत्तर भारताच्या पर्यटन दौर्यावर गेले होते. तेथे असतानाच त्यांचे निधन झाले.

उद्या अंत्ययात्रा
स्व.नेवे यांचे पार्थिव जळगाव येथे नानीबाई हॉस्पिटलजवळ, ईश्वर कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवार, 17 रोजी आणण्यात येणार आहे. गुरुवारी सायंकाळी अंत्ययात्रा राहत्या घरापासूनच अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा व दोन मुले व सून असा परीवार आहे.

पत्रकारीतेत उमटवला ठसा : विविध पुरस्कारांनी गौरव
वकिली व्यवसाय करतानाच पत्रकारीतेकडे वळत प्रारंभी दैनिक गावकरी, नंतर लोकमत व तरुण भारतमध्ये स्व.नेवे यांनी काम केले. ‘तरुण भारत’मध्ये निवासी संपादक म्हणून ते साडेतीन वर्षे कार्यरत होते. या काळात ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले. त्यांना पत्रकारीतेतील ‘भाला’कार भोपटकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांनी शोकभावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. ते कल्पेश व मयूर नेवे यांचे वडील होत.


कॉपी करू नका.