भुसावळ शहरासह यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर बिरसा मुंडा जयंती उत्साहात
यावल : तालुक्यातील डोंगरदे व ईटवा या आदिवासी पाड्यांवर क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आश्रय फाउंडेशनतर्फे संपर्क पंढरवाडा अभियान अंतर्गत आदिवासी बांधवांसोबत जयंती साजरी ककरण्यात आली. यावेळी भारत मातेच्या व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. आदिवासी पाड्यामध्ये असलेल्या समस्या जाणून घेण्यात आल्या व या भविष्यात यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावेळी प.पू.स्वामी स्वरूपानंद महाराज, काशीराम बारेला, दिलीप कोकणी, दिनेश बारेला आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडात चौकात जयंती उत्साहात
भुसावळ : शहरातील क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा चौकात क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ठाकूर समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ किसन ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. प्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी, तालुकाध्यक्ष हिंमत ठाकूर, माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, समाज सेवक प्रशांत गोरख ठाकूर ,दत्तू ठाकूर,विठ्ठल भगवान ठाकूर, भगवान ठाकूर, श्रावण बाविस्कर, किरण ठाकूर, हिरामण ठाकूर, दिलीप महाले, सीताराम ठाकूर, सुनील ठाकूर, सुरेश ठाकूर, प्रवीण ठाकूर, विजय ठाकूर, संजय ठाकूर, आदित्य ठाकूर, विजय ठाकूर, पंकज ठाकूर, सचिन ठाकूर, युवराज ठाकूर, उज्वल ठाकूर, यश ठाकूर, अशोक ठाकूर, संदीप ठाकूर, जयेश ठाकूर, सुमित ठाकूर, नामदेव ठाकूर, राहुल ठाकूर, महादेव ठाकूर, संजय ठाकूर, बाळकृष्ण पवार, दिलीप ठाकूर, किरण ठाकूर आदींची उपस्थिती होती.

