श्री.संत मुक्ताई मंदिरातील सेवेकरी आत्माराम हातोळकर यांचे निधन

आदिशक्ती मुक्ताई मंदिरातील निष्ठावान सेवेकरी म्हणून होती पंचक्रोशीत ख्याती


मुक्ताईनगर : तीर्थक्षेत्र आदिशक्ती श्री संत मुक्ताई, ुने कोथळी येथील मंदिरात १२ वर्षापेक्षा अधिक काळापासून आईसाहेबांच्या सेवेत असलेले अत्यंत प्रामाणिक मनमिळावू, कनवाळू स्वभावाचे तसेच हजारो लाखो वारकर्‍यांचे आवडते निष्काम कर्मयोगी स्व.आत्माराम उर्फ आबा हातोलकर (रा. मुळगाव हातोळा, जि.अकोला) यांना पहाटेच्या काकड आरती व पूजेनंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

वारकरी संप्रदायात हळहळ
एक निष्काम व प्रामाणिक वारकरी असा अचानक निघून गेल्याने तमाम वारकरी परीवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाच्या वार्तेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, उद्धव महाराज सेवेकरी कर्मचारी फडावरील कीर्तनकार वारकरी भाविकांतर्फे त्यांना भावपूर्ण निरोप देवून अंतेष्टीसाठी त्यांचा देह मूळ गावी हातोळा, जि.अकोला येथे रवाना करण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !