Death threat to Rahul Gandhi ; A letter to blow up with a bomb as soon as it arrives in Indore! राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी ; इंदूरमध्ये येताच बॉम्बने उडवून देण्याचे पत्र !


Death threat to Rahul Gandhi ; A letter to blow up with a bomb as soon as it arrives in Indore! इंदौर  : भारत जोडो’ यात्रेमुळे चर्चेत आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने देशात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवत राहुल गांधींना धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी इंदूरमध्ये येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे.

क्राईम ब्राँचकडून पत्र पाठवणार्‍याचा शोध
राहुल गांधींना बॉम्बने उडवू, असे धमकावण्यात आले आहे. पोलिस आणि क्राइम ब्राँच हे निनावी पत्र पाठवणार्‍याचा शोध घेत आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राहुल गांधी मध्यप्रदेशात येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !