कडकनाथ प्रकरणात यावलच्या दोघांना पाच लाखांचा गंडा
यावल : कडकनाथ कोंबडी पालन व त्यांच्या अंड्यांचा फॉर्म टाकण्याच्या नावाखाली तब्बल पाच लाखात शहरातील दोघांना गंडवण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात आरीफ खान अयुब खान व इरफान शेख अनिस यांच्या फिर्यादीनुसार रयत ऍग्रो इंडिया कंपनी व महारयत ऍग्रो इंडिया विरोधात गुन्हा दाखल करण्यातआला. तक्रारीचा आशय असा की, कडकनाथ जातीच्या कोंबड्या व अंडी फॉर्म टाकण्याचे आश्वासन देत पाच लाख रुपये घेण्यात आले व पैसे भरल्यानंतर आम्हास कोंबड्यांची पिले व अंडी देण्यात येणार होती मात्र कंपनीने ती दिले नाही. यात वरील कंपनीचे अधिकारी सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे व विनय उर्फ विजय शेंडे (रा.मोहिते वडगाव, जि. सांगली) यांनी दिशाभूल केली. कडकनाथ कोंबडी पालन व अंडीचा व्यवसाय करीता फार्म टाकण्यासाठी दोघांकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये घेण्यात आले व त्या मोबदल्याने ते 200 पक्षी देणार होते. नंतर त्या पक्ष्यांचे खाद्य देणे व नंतर अंडी खरेदी करण्याचा करार केला होता मात्र झालेल्या करारानुसार पक्षी दिलेच नाही.

