मांगलवाडीच्या शेतकर्‍याची आत्महत्या


रावेर : तालुक्यातील मांगलवाडी येथील तुळशिदास दयाराम तायडे (वय 47) या शेतकर्‍याने नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. 7 रोजी पहाटे त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर त्यांना तत्काळ जळगावी हलवण्यात आले. काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तायडेंना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत तुळशीदास तायडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !