वरणगाव शहरात नाना नांनी उद्यानाची लवकरच निर्मिती
नगराध्यक्ष सुनील काळे : वरणगाव पेन्शनर्स संघटनेची सभा उत्साहात
भुसावळ : आई-वडीलांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळे मी वरणगाव नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकलो तसेच वरणगाव शहरातील पेन्शनर नागरीकांसाठी जागा उपलब्ध करून या जागेवर नगरपरीषदेच्या वतीने एक हॉल बांधून देण्या साठी प्रयत्न करू, अशी ग्वाही नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे दिली. वरणगाव पेन्शनर संघटनेची सभा अध्यक्ष बी.टी.इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे बोलत होते.
यांची सभेला उपस्थिती
मुख्याधिकारी शामकुमार गोसावी, सचिव ए.व्ही.काटकर, चांगो झोपे, विजय पाटील, ढाके, जे.बी.माळी यांच्यासह शेकडो ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.


शहरात नाना-नानी उद्यानाची उभारणी
नगराध्यक्ष सुनील काळे मनोगतात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांनी ज्येष्ठांना त्रास दिल्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार करता येणार आहे. त्यांना तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्याचा कायदा केंद्र सरकारने करून एका प्रकारे जेष्ठांना न्याय देण्याचे क्रांतीकारी पाऊल पंतप्रधानांनी उचलल्याचे यावेळी सांगून वरणगाव शहरात ज्येष्ठ नागरीकांसाठी दोन कोटी 81 लाखांचे वरणगाव शहरात नाना-नानी उद्यान लवकरच उभारणार असून भोगावती नदीचे पाच कोटीतून सुशोभीकरण करून घाट बांधून किनार्यावर ओपन जिम बगीचा उभारणार असल्याचे ते म्हणाले.
