भुसावळात राज्यपाल कोश्यारींसह सूधांशू त्रिवेदींच्या प्रतिमेला मारले जोडे


In Bhusawal, the statue of Sudhanshu Trivedi along with Governor Koshyari was killed भुसावळ : राज्यपाल भगतसिंग कोषारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याने त्याचा सोमवारी भुसावळ शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने उभयंतांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध केला.

यांची आंदोलनप्रसंगी उपस्थित
यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा चौकात झालेल्या आंदोलनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍या राज्यपाल कोषारी व भाजपाचे प्रवक्ते त्रिवेदी यांना तत्काळ पदावरून पाय उतार करण्याची मागणी करण्यात आली तसेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभयंतांच्या वक्तव्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख दीपक धांडे, शहरप्रमुख हेमंत खंबाईत, विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन, अ‍ॅड.कैलास लोखंडे, राकेश खरारे, स्वप्नील सावळे, सोनी ठाकूर, मनोज पवार, नबी पटेल, शेख महमूद, नामदेव बर्‍हाटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !