भोकर नदीनजीक अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त


रावेर : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांविरुद्ध महसूल प्रशासनाकडून मोहिम सुरू असून बुधवारी पहाटे भोकर नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर महसूल पथकाने अचानक धाड टाकत कारवाई केल्याने अवैध वाळू वाहतूकदाराला सुमारे सव्वा लाख दंड आता सुनावण्यात येणार आहे. रावेर परीसरातील तापी, भोकर, सुकी नद्यांमधील वाळूचा अद्याप लिलाव झाला नसल्याने वाळू तस्कर चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करीत आहेत. बुधवारी सकाळी ट्रॅक्टर (एम.पी.12 ए.3136) द्वारे भोकर नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी पी.डी.आळे, दादाराव कांबळे, भरत वानखेडे, यासीन तडवी, शैलेश झोटे, बारेला, निलेश पाटील यांच्या पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !