भुसावळ मनसेच्या शहराध्यक्षपदी राहुल सोनटक्के


भुसावळ : राज ठाकरे यांच्या आदेशाने व जिल्हा संपर्क अध्यक्ष विनय भोईटे यांच्या मार्गदर्शनानखाली मनसेच्या भुसावळ शहर अध्यक्षपदी राहुल सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक यांच्याहस्ते राहुल सोनटक्के यांना जळगाव येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. भुसावळ शहरात पक्षाची बांधणी, संघटन, वॉर्ड तेथे शाखा याबाबत योग्य ते काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित शहराध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी यावेळी दिली.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी तालुकाध्यक्ष धीरज वाघमारे, संजय कुलकर्णी, सिद्धेश कवठाळकर, मंगेश भावे, धीरज चौधरी, सुजित शिंदे, सचिन राऊत, अनुप कनोजे, नबाब गवळी हरीश पाटील उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !