महाराष्ट्रातून राज्यपालांची हकालपट्टी करा : सावद्यात शिवसेनेची मागणी
Dismiss the governor from Maharashtra: Shiv Sena’s demand in Savada सावदा : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा शिवसेनेतर्फे निषेध करीत राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्याची मागणी पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
पोलिस प्रशासनाला निवेदन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सावदातर्फे मंगळवारी सावदा सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्याचा आशय असा की, राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी संभाजीनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठात दीक्षा कार्यक्रमात छत्रपती शिवरायांची तुलना गडकरींशी करून मराठी जनतेच्या तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितल्याचे विधान करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.


यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देताना शिवसेनेचे मिलिंद पाटील, भरत नेहमे, शरद भारंबे, योगीता वायकोळे, धनंजय चौधरी, शाम पाटील, डिगंबर महाजन, गौरव भैरवा, सुनील राणे, किरण गुरव, शेख फरीद आदींची उपस्थिती होती.