मुक्ताईनगरात मंत्री गिरीश महाजनांची प्रतिमा जाळली

आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद : खालच्या स्तरावरील वक्तव्याचा भुसावळस मुक्ताईनगर शहरातील पदाधिकार्‍यांनी केला निषेध


मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्याविषयी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या अत्यंत खालच्या स्तरावरील वक्तव्याचा मुक्ताईनगरातील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी निषेध करण्यात आला. मंत्री महाजन यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करीत असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

मुक्ताईनगरात प्रतिमा जाळली
या संदर्भात तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. शहरातील प्रवर्तन चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेचे दहन केले व नतंर प्रवर्तन चौकातून तहसील कार्यालयापर्यंत पदाधिकार्‍यांनी पायदळ जात गिरीश महाजन यांच्या निषेधाच्या घोषणा देत निवेदन दिले.



यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, कोथळीचे सरपंच नारायण चौधरी, विशाल महाराज खोले, डॉक्टर बीसी महाजन, बापू ससाने, शहराध्यक्ष राजू माळी, माजी सभापती विलास धायडे, विकास पाटील, रामभाऊ पाटील, नंदकिशोर हिरोळे, युवक उपजिल्हाध्यक्ष पवनराजे पाटील, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, रवींद्र दांडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी तालुका पार्टी निषेध करीत असून त्यांनी माफी मागावी अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !