मंत्री महाजन यांच्या वक्तव्याचा भुसावळात निषेध : राष्ट्रवादीचे प्रशासनाला निवेदन
Minister Mahajan’s statement protested in Bhusawal : NCP’s statement to the administration भुसावळ : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे पूत्र स्व.निखील खडसे यांच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित करीत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी नव्या वादाला तोंड फोडले. मंत्री महाजन यांनी त्यांच्या वक्तव्यातून हलकट प्रवृत्तीच्या मानसिकतेचे दर्शन घडवले आहे तसेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असल्यानेच ते असे विधान करीत असल्याचा आरोप भुसावळातील स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी करीत तहसीलदार यांना निवेदन दिले.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, निलेश कोलते, रफिक शेख, सुमित बराटे, रवींद्र पाटील, अॅड.बोधराज चौधरी, अतुल चव्हाण, उसामा खान, एजाज खान, फैजान खान, मंदार भोईटे, भूषण तायडे, विशाल नारखेडे, मंगेश पाटील, अनिकेत पाटील, स्वराज पाटील, राजेश सुरवाडे, पवन गुजर, नदीम तडवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

