सावद्यात चर्मकार समाज व कोष्टी समाज मंदिरासाठी 50 लाखांचा निधी मंजूर
आमदार चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार : शहरवासीयांमधून समाधान
सावदा : सावदा शहरात विविध विकास कामासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरातील चर्मकार व कोष्टी समाजासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
20 वर्षांच्या मागणीला यश
सावदा शहरात गेल्या 20 ते 22 वर्षांपासून चर्मकार समाजासाठी समाज मंदिर होण्याची मागणी होत हेाती. यासाठी शहरातील चर्मकार समाजाचे गजानन नामदेव ठोसरे हे सामाजिक कार्यकर्ते तथा चर्मकार समाजाचे रावेर तालुकाध्यक्ष सातत्याने प्रयत्न करीत होते त्यासाठी त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मागणीची दखल घेत चर्मकार समाज बांधवांसाठी समाज मंदिरसाठी 25 लाखांचा निधी मंजूर केला आहे तर शहरातील कोष्टीवाडा, पुरातन महादेव मंदिरासाठी कोष्टी समाज बांधवासाठी महात्मा बसेश्वर सामाजिक सभागृहाची मागणीदेखील मंजूर झाली आहे. त्यासाठीदेखील 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोष्टी समाजाचे विश्वस्त लाला कोष्टी यांनी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठाण तसेच बद्री (सुरज) परदेशी यांच्या माध्यमातून ही मागणी केली होती. दरम्यान, आता या संदर्भात तातडीने निविदा मंजूर करून कामांना सुरूवात करावी, अशीदेखील अपेक्षा आहे.

