भुसावळ प्रीमियर लीगचा विजेता ठरला झारा सुपरस्ट्रायकर

उपविजेता ठरला साईजीवन संघ : मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान तंजिल खानला : विजेत्या संघाचा गौरव


भुसावळ : शहरातील डी.एस.मैदानावर आयोजित भुसावळ प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात साईजीवन संघाला 28 धावांनी नमवून झारा संघाने चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून झारा सुपर स्ट्रायकरचा अष्टपैलू खेळाडू तंजिल खान ठरला. त्याने स्पर्धेत 114 धावासह अंतिम सामन्यात चार गडीही बाद केले. शिवाय अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बहुमान ही तंजील खानला मिळाले.
विजय व उपविजयी संघाला आर.टी.स्पोर्टचे रोहित तलरेजा यांच्याकडून प्रत्येकी 41 व 21 हजार रोख बक्षीस देण्यात आले. या शिवाय तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण, ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक, माजी नगरसेवक निर्मल कोठारी अनिकेत पाटील, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, मनीष चव्हाण, वसीम खान, जाकिर बागवान, राहुल मकासरे, अर्षद सैय्यद, दीपक सोनवणे, प्रशांत अहिरे, पियुष महाजन, रमजान पटेल, तेजल पाटील, भूषण फालक यांच्या उपस्थितीत पारीतोषिक वितरण करण्यात आले. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या भुसावळ प्रीमियर लीगचे सर्व सामने रोमहर्षक झाले.



अंतिम सामन्यात झारा सुपरस्ट्रायकर विजयी
अंतिम सामना साई जीवन सुपर शॉपविरुद्ध झारा सुपरस्ट्राईकर यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना झारा स्ट्रायकर संघाने 104 धावा काढल्या. यात मोहम्मद नदीम याने अवघ्या 25 चेंडूत 43 धावा काढल्या तर तंजिल खानने दोन ओव्हरमध्ये 10 धावा देत चार गडी बात केले. सामना झारा सुपरस्ट्राकरने 28 धावांनी जिंकत चषकावर नाव कोरले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू व फलंदाज म्हणून तंजिल खानला गौरविण्यात आले तर बेस्ट गोलंदाजीचा सन्मान 11 गडी बाद करणार्‍या प्रतीक माळीला
मिळाले.

निर्मल कोठारीकडून तंजिलला 2100 बक्षीस
साईजीवन संघाचे मालक निर्मल कोठारी यांचा संघ उपविजेता ठरला. त्यांनी विजेत्या संघातील तंजिल खान याला प्रोत्साहन पर 2100 रुपये बक्षीस देऊन खेळाडू वृत्ती दाखवली.

राहुल तलरेजा उचलणार तंजिलचा क्रिकेट खर्च
स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघाला रोख रक्कम देणार्‍या रोहित तलरेजा यांनी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू तंजिल खानचे यापुढे क्रिकेटसाठी लागणारे सर्व खर्च उचलणार असून क्रिकेटसाठी सहकार्य करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. टॉस का बॉस म्हणून रेल्वेचे आर.पी.सुर्या यांनी त्या स्पर्धेतील सर्व बॉल उपलब्ध करून देण्यासाठी सुरेश वानखेडे यांनी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी भुसावळ युनिटी क्लबच्या खेळाडूने सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !