भुसावळात जिल्हास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
प्रताप महाविद्यालयाचा संघ विजयी तर नाहाटा महाविद्यालयाचा संघ उपविजयी
भुसावळ : महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धांना बियाणी मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 14 व 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ विभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाअध्यक्ष मनोज बियाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, रजनी सावकारे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी अरविंद खांडेकर, राज्य क्रिडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष तथा नाईन ए.साईट क्रिकेट संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक बी.एन.पाटील, बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील, उपप्राचार्य रमण भोळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, राजेंद्र कुलकर्णी, आप्पा कुलकर्णी सर्व संघांचे क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.
खेळात अपयश पचवण्याचीही हवी हिंमत
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, खेळ आपल्याला राष्ट्रीय एकात्मता, प्रेम भावना, यश संपादन करण्याची जिद्द तसेच अपयश पचवण्याची हिंमत शिकवतात. शासनाने खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण दिले असून पोलिस दलातील काही अधिकार्यांची थेट स्पोर्ट कोट्यातून निवड झाली आहे. आपल्यातील क्रीडा गुण दाखवून आपल्या शाळेचे, जिल्ह्याचे, राज्याचे नाव उंचवावे, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक आर.के.तायडे यांनी तर आभार बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील यांनी मानले.


प्रताप महाविद्यालयाचा संघ विजयी
स्पर्धेत 19 वर्ष मुलींच्या गटात अंतिम सामना नाहाटा विरुद्ध प्रताप कॉलेज. अमळनेर यांच्यात झाला. यात प्रताप कॉलेजचा संघ 20 धावांनी विजयी झाला. 19 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये पारोळा व पाचोरा सेमी फायनलमध्ये पोहोचले तसेच अमळनेर, भुसावळ, चाळीसगावख जळगाव कॉटर फायनलमध्ये पोहोचले. 14 वर्षवयोगटातील सामन्यांमध्ये जळगाव ग्रामीण सेमी फायनलमध्ये पोहोचला तर अमळनेर, पाचोरा, जामनेर, यावल हे संघ कॉटर फायनलमध्ये पोहोचले. पंच म्हणून हिंमत पाटील, रमण भोळे, अरविंद बडगुजर, पवार आदींनी काम पाहिले यशस्वीतेसाठी बियाणी मिलिटरी स्कूलचे सर्व शिक्षक खेळाडूंनी सहकार्य केले.