थंडीतही विद्यार्थ्यांना मायेची ऊब : भुसावळात प्राध्यापिकेने स्वर्खातून केले स्वेटर वाटप

थंडीतही विद्यार्थ्यांना मायेची ऊब ः श्री.र.नं.मेहता विद्यालयात उपक्रम


भुसावळ : हिंदी सेवा मंडळद्वारा संचालित श्री.र.नं.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी प्रा.रीता शर्मा यांनी स्वखर्चातून आज स्वेटर वाटप केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
याप्रसंगी हिंदी सेवा मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सत्यनारायण गोडाले, महामंत्री मधुलता शर्मा, सहमंत्री बिशनजी अग्रवाल उपस्थित होते. यावेळी प्रा.रीता शर्मा यांनी इतर आवश्यक उपयोगी व राबवित असणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले. इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शिरीन असलम खान हिने मनोगत व्यक्त केले. दीपक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर वैशाली चौधरी यांनी आभार मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !