भुसावळ विभागात संविधान दिन उत्साहात : ठिकठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे वाचन
भुसावळसह विभागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन ः मान्यवरांनी सांगितले संविधान दिनाचे महत्व
भुसावळ : संविधान दिनाचे औचित्य साधून शहर व विभागातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये संविधान प्रास्ताविकेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. मान्यवरांनी थोर पुरूषांच्या कार्याची माहिती देत संविधान दिवसाचे महत्वदेखील सांगितले.
जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक कमेटी
भुसावळ : शहरातील राजीव गांधी वाचनालयात जळगाव जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक कमेटीतर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. मो.मुन्वर खान, शेख हमीद गवळी, जे.बी.कोटेचा, नीळकंठ फालक, महेबूब खान आदींची उपस्थिती होती.


हिंदी महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 26 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी म्हणाले की, भारतीय संविधान हे नागरीकांमध्ये समानता स्वतंत्रता आणि न्याय देण्यासाठी आहे. सर्वधर्माच्या तळा-गाळातील लोकांना न्याय देण्याचा विचार डॉ.बाबासाहेबांनी संविधानात मांडलेला आहे तसेच सर्वांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला मिळालेल्या अधिकाराबरोबर कर्तव्याची ही जाणीव ठेवावी. आपले आचरण चांगले राहावे याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन डॉ.सुधीर शर्मा यांनी केले. डॉ.विवेक जोशी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.समता तायडे प्रा.शीबा खान व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोळे महाविद्यालयात संविधान दिन साजरा
भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजन एकक यांचेमार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.ए.आर.सावळे. प्रा.आर.डी.भोळे, प्रा.संगीता धर्माधिकारी प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.बी.ए.बेंडाळे, प्रा.डॉ.जे.पी.सरोदे, प्रा.आशिष महाजन, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.ए.जी.नेमाडे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.अंजली पाटील, सुनील ठोसर, प्रकाश सावळे, राष्ट्रीय एककचे विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वरणगावात संविधान दिन उत्साहात
वरणगाव : शहरातील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमावेळी संविधानाविषयी शपथ देण्यात आली. विद्यालयाचे पर्यवेक्षक एम.आर.चौधरी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम.डी.पाटील यांनी तर एस.डी.कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सांस्कृतिक मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी परीश्रम घेतले. विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.व्ही.सपकाळे, एस.डी.महाजन, ए.पी.खाटीक, पी.एच.बोरसे, ए.एम.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुक्ताईनगरात महापुरूषांच्या नावाचा जयघोष
मुक्ताईनगर : संविधान दिनानिमित्त मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात बौद्ध समाज बांधवांनी सकाळी नऊ वाजता भारतरत्न संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिवीर महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यांचे पूजन करून वंदन केले. सामूहिक बुद्ध वंदना घेऊन महापुरुषांचे नावाने घोषणा देऊन जयघोष करण्यात आला तसेच बी.डी.गवई यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला तर 26 जानेवारी 1950 रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला माजी सभापती संतोष बोदडे, माजी पोलिस पाटील मोहन मेढे, आर.पी.आय अध्यक्ष सुधाकर बोदडे, आर.के.गणेश, बापू ससाणे, कला मंच अध्यक्ष सखाराम हिरोडे, बी.डी.गवई, भिवाजी तायडे, आर.आर.धुरंदर, शाहीर रवींद्र बोदडे, अनिल बोदडे, उमेश झाल्टे, माणिक निकम, राजू बोदडे, जगदेव इंगळे, संतोष इंगळे, राहुल गणेश, संजीव पालवे, रमेश बोदडे आदी समाजबांधव बौद्ध उपासक उपस्थित होते.

यावल पोलिस ठाण्यात संविधानाचे पूजन करून
यावल : यावल पोलिस ठाण्यात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व 26/11 च्या दहशतवादी हल्यातील श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व मॉर्डन इंग्लिश मिडीयम स्कूलचे भूषण नगरे यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, उपनिरीक्षक सुदाम काकडे, एएसआय विजय पाचपोळे, एएसआय मुजफ्फर शेख, एएसआय असलम खान, बालक बार्हे, योगेश खडके, संदीप सूर्यवंशी, अशोक बाविस्कर, भूषण चव्हाण जगन्नाथ पाटील, गणी मिर्झा, गणेश ढाकणे, अनिल पाटील, रऊफ शेख व पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
यावल : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व विषद केले. विद्यार्थ्यांना भारतीय संविधान उद्देशिकेची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व जवानांना व नागरीकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील, डॉ.एस.पी.कापडे, डॉ.सुधा खराटे, डॉ.पी.व्ही.पावरा, डॉ.आर.डी.पवार, डॉ.अनिल पाटील, डॉ.निर्मला पवार, प्रा.गणेश जाधव, प्रा.सुभाष कामळी, डॉ.संतोष जाधव, प्रा.वैशाली कोष्टी, प्रा.एम.पी.मोरे, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे, दशरथ पाटील आदी उपस्थित होते.
बोदवड उर्दू कन्या शाळा
बोदवड : शहरातील जामठी रोडवरील जिल्हा परीषद उर्दू कन्या शाळेत अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शेख इक्बाल फयाजुद्दीन होते.
यावेळी शाळेचे समन्वयक सादिक अहमद, नियामत मिर्झा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक बोदवड सरचिटणीस मजहर मुख्तार शाह, खजिनदार जैनुल आबिदीन, जावेद शाह, आसीफ खान व सर्व महिला शिक्षक उपस्थित होते.