भुसावळात परमिटरूम बियरबारला नागरीकांचा विरोध


भुसावळ : शहरातील श्रध्दा नगर, जामनेर रोडवरील साईबाबा व गजानन महाराज मंदिरादम्यान परमिटरम बियरबार एफएल 03 ला रहिवासी नागरीकांनी विरोध केला आहे. नागरीकांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव अधीक्षक यांना नुकतेच देण्यात आले.

रहिवासी भागातील दुकानाला विरोध
शहरातील जामनेर रोडवरील श्रद्धा नगर, साईबाबा व गजानन महाराज मंदिर दरम्यान रहिवासी भाग आहे. शहरातील भूमापन क्र 115/1/अ मध्ये परमिटरूम बिअरबार (एफएल 03) ही नियोजित जागा आहे. ही जागा नागरीवस्ती असलेल्या भागात असून नागरी रहिवास असलेल्या भूखंडापासून 100 मीटर अंतराच्या आत आहे तसेच साईबाबा व गजानन महाराज मंदिरा दरम्यान ही जागा येते. या ठिकाणी परमिटरूम बिअरबारला नागरीकांनी विरोध करीत त्याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, भुसावळ, पोलिस अधीक्षक जळगाव, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक जळगाव यांना जून महिन्यात देण्यात आले मात्र त्यानंतरही वरील ठिकाणी परमीट रूम बियरबार सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने पुन्हा अपर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना देण्यात आले.



यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर सुरेश जावळे, पंकज पाटील,सरला देवगिरे, प्रियंका धांडे, अनिल तळेले, जमेरसिंग चितोडीया, विमन्द्र चितोडीया, वकडी चितोडीया, राफसिंग चितोडीया, किशोर पाटील, रवींद्र तळेले, प्रमोद पाटील, किशोर पाटील, सुरेखा जैन, रीतेश जैन आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !