शिरसाळा मारोतीच्या चरणी अडीच किलो चांदीची गदा अर्पण
बोदवड : श्री क्षेत्र शिरसाळा मारोती येथे मोठ्या प्रमाणात भाविक जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून हजेरी लावतात. ईच्छा पुर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी या धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या शनिवारी भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील गोपी राजपुत यांनी ढोल ताश्यांच्या गजरात वाजतगाजत अडीच किलो चांदीचा गदा शिरसाळा मारोतीराया चरणी अर्पण केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण बजरंग भक्त उपस्थित होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक तथा साईसेवक पिंटू कोठारी, शेखर सोनवणे यांच्यासमवेत साई मित्र परीवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

