मुक्ताईनगर मतदारसंघात अडीच कोटी रुपयांची कामे मंजूर

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला यश : नागरीकांमध्ये समाधान


Works worth Rs 2.5 crore approved in Muktainagar Constituency मुक्ताईनगर : अल्पसंख्यांक बहुल नागरीक क्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेंतर्गत मुक्ताईनगर संघातील नगरपालिका क्षेत्रात 2.50 कोटी रुपयांची विविध विकास कामे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

विविध विकासकामे होणार
अल्पसंख्यांक बहुल नागरीक क्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेंतर्गत मुक्ताईनगर संघातील सावदा, मुक्ताईनगर व बोदवड नगरपालिका क्षेत्रातील मुस्लिम बहुल विविध वार्डातील विविध कामांना मंजूरी मिळाली. त्यात सावदा नगरपरीषद हद्दीत अल्पसंख्यांक वस्तीमध्ये विविध विकासकामांसाठ 80 लाख तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत अल्पसंख्यांक वस्तीमध्ये विविध विकास कामांसाठी 90 लाख तर बोदवड नगरपंचायत हद्दीत अल्पसंख्यांक वस्तीमध्ये विविध विकासकामांसाठी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.


कॉपी करू नका.