शेअर ट्रेडींगच्या नावाखाली वृद्धाला दीड कोटीत गंडवले ; जळगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

ऑनलाईन बनावट कंपनी, ईलेक्ट्रॉनिक रेकॉर्डही खोटे ; मोठे आर्थिक अफरातफरीचे रॅकेट


In the name of share trading, an old man was cheated of one and a half crores ; A case against three in Jalgaon police! जळगाव : जळगावच्या वृद्धाची ऑनलाईन शेअर ट्रेडींगच्या नावाखाली तब्बल एक कोटी 44 लाख 26 हजार 116 रुपयात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वासुदेव रामदास महाजन (रा.किरण लेकसाईड रेसीडेन्सी, शिरसोली रोड, जळगाव), असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. आरोपींनी बनावट कंपनीच्या ऑनलाईन खोटे ईलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे.

बनावट रेकॉर्डद्वारे केली फसवणूक
वासुदेव महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 31 ऑक्टोबर 2022 रोजी ते आजपावेतो नाशिक व कोलकत्ता येथे नमूद असलेली ग्रोथ ट्रेड इंडिया (दि मार्क ट्रेडस) चे वर उल्लेख केलेले आयशा (पूर्ण नाव माहित नाही), विष्णू अग्रवाल, रीचा गुप्ता, अंगदसिंग उर्फ अरुण (पूर्ण नाव माहित नाही) अशी नावे असलेल्या व्यक्तींनी ग्रोथट्रेड (दि मार्क ट्रेडस) या नावे एक खोटी व बनावट कंपनी संगणकाच्या माध्यमातून उभी केली. त्यावर सारे खोटे ईलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार केले.

अफरातफरीचे मोठे रॅकेट सक्रिय
नफ्याचे रेकॉर्ड इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना फसविण्यासाठी प्रसारीत करण्यात आले व या खोटेपणाला व लबाडीला आपण बळी पडलो तसेच संशयीतांनी महाजन यांना वेळोवेळी शेअर ट्रेडींगमध्ये फायदा झाल्याचे खोटे सांगून पैसे देण्यास प्रवृत्तही केले. संशयीतांना आतापर्यंत एक कोटी 44 लाख 26 हजार 116 रुपये एव्हढी रक्कम वेळोवेळी देण्यात आली. ती रक्कम आज देतो, उद्या देतो, असे अनेकदा सांगून परत न देता फसवणूक केली. खोटे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करीत संशयीतांनी इंटरनेटचा वापर करीत मोठे आर्थिक अफरातफरीचे रॅकेट चालविले आहे. ज्याव्दारे अनेक लोकांची करोडो रुपयांची फसवणूक व अफरातफर झाली आहे. हा अत्यंत मोठया रकमेचा व गंभीर आर्थिक गुन्हा असून आपल्याला सात कोटी 68 लाख 79 हजार 518 एवढी रक्कम नफा मिळाल्याचे व तो प्रत्यक्ष देऊ असे सांगीतले होते, असेही फिर्यादीत महाजन यांनी म्हटले आहे. याप्रकरणी आयशा (पूर्ण नाव माहित नाही), विष्णू अग्रवाल, रीचा गुप्ता, अंगदसींग उर्फ अरुण (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.