भुसावळात किरकोळ कारणावरून हाणामारी : चौघांविरुद्ध गुन्हा


भुसावळ- शहरातील सिंधी कॉलनीतील रीतेश रत्नानी व गिरीष चावला हे हरीश कुकरेजा यांचा मुलगा गौरव व पुतण्या सागर यांना नेहमी धमकी देत असल्याने कुकरेजा हे जानू रत्नानी यांना त्यांच्या दुकानावर सांगण्यास गेल्यानंतर गिरीष चावला यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. हरीश कुकरेजा यांना या हल्यातून त्यांचे भाऊ धनराज कुकरेजा व आकाश यांनी सोडविले. कुकरेजा यांच्यावर जळगाव येथे जिल्हा वैद्यकीय कॉलेज व हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहे. हरीश कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून रीतेश रत्नानी, गिरीष चावला, जानू रत्नानी व हरेश चावला यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.


कॉपी करू नका.