जळगाव जिल्हा दूध संघासाठी खडसे-महाजनांची प्रतिष्ठा पणाला


Voting for Jalgaon District Milk Union Begins जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथराव खडसे विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांपैकी कोण बाजी मारेल याचीच उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली असून शनिवार, 11 रोजी 20 जागांसाठी मतदानाला सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली.

441 मतदार बजावणार हक्क
जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा 7 तालुक्यात शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीला 441 जण मतदान करणार आहेत. भुसावळ मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. भुसावळमध्ये एक मतदान केंद्र लावण्यात आले असून या केंद्रावर 44 जण मतदान करणार आहेत.



महापौरांनी बजावला हक्क
जळगाव दूध संघ निवडणूकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन या जळगाव तालुक्यातून उमेदवार आहेत. जळगाव शहरातील सत्य वॉलभ मतदान केंद्रावर महापौर जयश्री महाजन यांनी आणि त्यांच्या सासू मालती महाजन यांनी मतदान करून मतदानाचा पहिला हक्क बजावला. दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस पहायला मिळतेय.

खडसेंविरोधात सात आमदार
एकनाथराव खडसे यांच्या विरोधात पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार विरोधात आहेत. जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारण पाहता, शिंदे-भाजप गटासाठीदेखील ही लढाई सोपी नाही. त्यामुळे या राजकीय आखाड्यात कोण विजयी ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !