भुसावळात भोरगाव लेवा पंचायतीतर्फे फेब्रुवारी महिन्यात होणार सामूहिक विवाह सोहळा

भोरगाव लेवा पंचायतीच्या बैठकीत निर्णय : खर्चाला बसणार आळा


भुसावळ : भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, भुसावळतर्फे सामूहिक विवाहाचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्याचा निर्णय पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला. भोरगाव लेवा पंचायतीतर्फे यंदा पाचव्यांदा सामूहिक विवाहाचे आयोजन केले जात आहे. समाजातील रूढी, परंपरा, सामाजिक समस्या व खर्चिक लग्न पध्दतीला आळा बसावा म्हणून सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले.

पाचव्यांदा होणार मेळावा
भोरगाव लेवा पंचायतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत यंदा सुध्दा पंचायतीतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याचे ठरले. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, सामाजिक समस्या व खर्चिक लग्न पध्दतीला आळा बसावा म्हणून लोकाग्रहास्तव दरवर्षी प्रमाणे यंदाही पाचव्यांदा हे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या मुला-मुलींचे लग्न ठरले आहे, ज्यांना पैश्यांचा अपव्यय वाचवायचा आहे, अश्या वधू-वरांनी त्यांनी त्वरीत नावे नोंदणी करावी. या सोहळ्यात वैदिक पध्दतीने विवाह विधी केला जाणार आहे. संस्थेतर्फे गॅस शेगडी, सिलेंडर, मिक्सर, कुकर, संसारोपयोगी साहित्य, पैठणी, ड्रेस भेट म्हणून दिले जाणार आहे. वधू-वरांना देण्यात येणार्‍या संसारोपयोगी वस्तूंची किंमत प्रत्येकी 20 हजार रुपयांपर्यत आहे. ज्या विवाहोच्छूक युवक युवतींनी सकाळी 11 ते 3 या वेळेत जामनेर रोडवरील भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखा ऑफीस येथे संपर्क करावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. बैठकीला पंचायतीचे संचालक, प्रकल्प चेअरमन उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !