भुसावळात उद्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा
भुसावळ : भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांचा रविवार, 11 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रोफेसर कॉलनीतील, बियाणी पब्लिक स्कूलमध्ये आमदार संजयभाऊ सावकारे मित्र परीवारातर्फे सायंकाळी सहा वाजता अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.