खडसेंना मोठा धक्का : जिल्हा दुध संघात मंदाताई खडसेंचा पराभव ; मंगेश चव्हाणांनी मारली बाजी


A big blow to the Khadses : Mandatai Khadses lost in the District Milk Association; Mangesh Chavan hit the bet जळगाव : जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत जिल्हावासायांचे लक्ष आमदार मंगेश चव्हाण व मंदाताई खडसे यांच्यातून कोण विजयी होणार? याकडे लागले असतानाच आमदार चव्हाण यांनी बाजी मारत मंदाताई खडसे यांचा पराभव केला आहे. ही बाब माजी मंत्री खडसे यांच्यासाठी धक्कादायक मानली जात आहे.

दुध संघातील अपहाराचे प्रकरण काढले शोधून
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा दुध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली. यात आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मुख्य प्रशासकपदाची धुरा आली. या निर्णयाच्या विरोधात खडसे गट न्यायालयात गेले. तेथे या निर्णयाला स्थगिती मिळाली. तथापि, त्यांना प्रशासकपदासाठी 32 दिवसांचा कालावधी मिळाला. या काळात त्यांनी दुध संघातील अपहाराचे प्रकरण शोधून काढत गुन्हा दाखल केला. यानंतर दुध संघाची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी आपण खडसे कुटुंबातील सदस्याच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी थेट मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला.



आमदार चव्हाणांचे भाकीत ठरले खरे
निवडणुकीच्या प्रचारात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. स्वत: मंगेश चव्हाण यांनी मंदाताई खडसे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केलेत तर नाथाभाऊंनी देखील याला प्रत्युत्तर दिले. प्रचाराच्या अंतीम टप्प्यात मंगेश चव्हाण हे अजूनच आक्रमक झाले. मतदानाच्या दिवशीच त्यांनी मतमोजणीत खडसे यांचा मोठा पराभव होणार असल्याचे भाकीत केले होते. रविवारी मतमोजणीतून ही बाब अधोरेखीतदेखील झाले.

अत्यंत चुरशीची झाली निवडणूक
रविवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांचा विजय झाला. ही लढत अतिशय चुरशीची झाली. यात मंगेश चव्हाण यांनी 76 मतांनी विजय संपादीत केला. दुध संघाच्या निवडणुकीतील ही सर्वात मोठी लढाई मानली जात होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !