मोठा दिलासा : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अखेर जामीन
Big relief: Former Home Minister Anil Deshmukh finally granted bail मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला असून आता त्यांना आठवड्यातून दोन दिवस ईडी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे.
भ्रष्टाचार प्रकरणी अटक
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मार्फत चौकशी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळालेला आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायलयाने अनिल देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या एकल खंडपीठाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आता न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला.


उच्च न्यायालयात दिलासा
गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मागितला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे. गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मागितला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे.
नेमके प्रकरण काय?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असणारे अनिल देशमुख हे 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख आरोपी आहे. त्यांना आधी ईडीने अटक केली होती. मात्र ईडीकडून त्यांना आधीच जामीन मंजूर झाला तर आज सीबीआच्या केसमध्येही जामीन मंजूर झाला आहे.
2021 मध्ये अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. न्या. एन. जे. जमादार यांनी देशमुख यांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.