राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
Death threat to NCP President Sharad Pawar मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामदेवी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदीतून दिली धमकी
फोन करणार्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती आहे.पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शरद पवार यांचा काल 82 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर शरद पवार यांना लगेच धमकीचा फोन येण्याने घटनेचं गांभीर्य अधिक आहे. त्याची दखल आता पोलिसांनी घेतली आहे. या धमकीच्या फोनची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. देशी कट्ट्याने ठार मारू, असा इशारा धमकी देणार्या व्यक्तीने दिला आहे. फोन करणारी व्यक्ती हिंदीतून बोलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

