बॉक्सींग स्पर्धेत भुसावळातील गाडगेबाबा महाविद्यालयाचा डंका

भुसावळकन्या ठरली बेस्ट बॉक्सर : सहा जणांची चॅम्पियनशीपसाठी निवड


भुसावळ : शहरातील श्री संत गाडगेबाबा महाराज हिंदी महाविद्यालयाचे व श्री छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीच्या तीन मुलांसह दोघा मुलींची व औरंगाबाद युनिव्हर्सिटीच्या एका खेळाडूची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. भुसावळातील महिला बॉक्सिंग खेळाडूची बेस्ट बॉक्सर म्हणून निवड झाली आहे.

या खेळाडूंची निवड
नुकत्याच नागपूर येथे बॉक्सिंग स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत श्री संत गाडगेबाबा महाराज हिंदी महाविद्यालयाचे व श्री छत्रपती शिवाजी महाराज बॉक्सिंग अकॅडमीचे विद्यार्थी प्रथमेश आव्हाड, गोपाळ दीपक खंडारे, अमन भालेराव, प्रियंका चिंतामणी शिरसाळे, पूजा अण्णा शिंदे व औरंगाबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी रीतेश मोरे या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियनशीपसाठी निवड झाली आहे. नागपूरात झालेल्या 21 व्या वरीष्ठ महिला बॉक्सिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2022 मध्ये छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अ‍ॅकेडमीच्या प्रियंका शिरसाळेने महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व उत्कृष्ट खेळाडू म्हणजे बेस्ट बॉक्सर ट्रॉफी मिळवली व सुवर्णपदक पटकावून जिल्ह्यातील पहिली वरीष्ठ महिला बॉक्सर असा मान मिळवला आहे. यशस्वी खेळाडूंना एनआयएस बॉक्सींग कोच नरेंद्र उर्फ बाळा मोरे यांनी मार्गदर्शन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !