महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणार्या मंत्री चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला मारले जोडे
अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करा ः सावद्यातील बहुजन समाज बांधवांची मागणी
सावदा : राज्यातील महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणार्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सावदा बस्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शहर व परीसरातील बहुजन समाज बांधवांकडून निषेध करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला. मंत्री पाटील यांच्या विरोधात अॅट्रासिटी दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी रमाकांत तायडे उर्फ (जोजो), अनोमदर्शी तायडे (सर), प्रदीप तायडे, पंकज पाटील, खुशाल निकम, युवराज लोखंडे, नाना संन्यास, गजू मिलिंद लोखंडे, उमेश बडगे, गणेश तायडे, वाघराज तायडे, वेडू लोखंडे, सदू भालेराव, टारझन तायडे उर्फ (भावड्या) यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री पदावरून करावी हकालपट्टी
मंत्री पदावरील व्यक्तीने केलेल्या वक्तव्याचा सावद्यात निषेध करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अतिशय निंदनीय व अजिबात न शोभणार्या भाषेत बेताल वक्तव्य करून थेट संपूर्ण बहुजन समाजाच्या भावना दुखवणारे विधान करून चंद्रकांत पाटील यांनी कायद्याची पायमल्ली केल्याची भावना व्यक्त करण्यात आली. बेतला विधानमुळे त्यांची तत्काळ मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.