वासुदेव नेत्रालयाचा मंगळवारी भुमिपूजन सोहळा
भुसावळ : ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानद्वारे वरणगाव शहरात मंगळवार, २० रोजी २५ ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये श्रीमद भगवान पंचमुखी हनुमान कवच पाठाचे ११११ वेळा पठण आणि हवन असून सोबतच वासुदेव नेत्रालयाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यांची राहणार उपस्थिती
वासुदेव नेत्रालयचे संचालक डॉ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील यांचे आई-वडील वैशाली पाटील आणि तुकाराम पाटील, साकळी येथील गुरुदेव जितेंद्र नेवे (छोटू बाबा), आणि महावीर ज्वेल्लर्स जळगावचे संचालक निलेश ललवाणी (जळगाव) यांच्याहस्ते भूमिपूजन होईल. वरणगाव आणि पंचक्रोशीत पंचमुखी हनुमान कवचचे हवन प्रथमच होत आहे. नागरीकांनी दिवसभरात आपल्या सोयीनुसार दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वासुदेव नेत्रालयातर्फे करण्यात आले आहे.
