मूकबधीर विद्यार्थ्यांच्या केंद्राला किराणा साहित्यासह प्युरीफायरची भेट

भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम


जळगाव ; अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे संचलित अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांच्या निवासी केंद्रात भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी मुकबधीर विद्यार्थ्यांना किराणा किटसट वॉटर प्युरीफायर भेट देण्यात आले. यावेळी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन अ‍ॅड.आय.आय.खान यांनी केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
विविध जादूचे प्रयोग करून अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांचे उत्सुकता वाढवली. अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याचे वॉटर प्युरीफायर तसेच आवश्यक किराणा किट वाटप करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये विजयी स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. प्रसंगी भुसावळ येथील वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील, भुसावळ येथील महिला व बाल विकास केंद्राच्या भारती मस्के, अ‍ॅड.आय.आय.खान, अ‍ॅड.रमेश पांडव, अ‍ॅड.अभिजी रंधे, अ‍ॅड.प्रिया अडकमोल, निरंजना तायडे, संगीता भामरे, सुजाता वाघोदे व अक्षय अपंग संमिश्र केंद्र प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !