अल्पवयीन मुलीवर 11 जणांचा सामूहिक बलात्कार : पालघर हादरले


Minor girl gang-raped by 11 people : Palghar shaken ठाणे : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटनात वाढ झाली असून पालघरमधूनही धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर तब्बल 11 नराधमांनी अत्याचार केला असून या घटनेने राज्यात संतापाचे वातावरण आहे. आठ नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

पालघरमध्ये उडाली खळबळ
सातपाटी सागरी पोलिल स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश आरोपी हे नशेच्या आहारी गेल्याचे माहिती देखील समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे सर्व आरोपी माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !