ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी उज्ज्वला बागुल
भुसावळ : शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डात ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी व जिल्हा मार्गदर्शक विकास महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हा सचिव अॅड.जास्वंदी भंडारी यांनी भुसावळ शाखेची कार्यकारणी जाहीर केली. त्यात भुसावळ तालुकाध्यक्षपदी पत्रकार उज्वला बागुल यांची निवड करण्यात आली.
अन्य कार्यकारीणी अशी
तालुका उपाध्यक्ष संजयसिंग चव्हाण, तालुका सचिव डॉ.नितीन यावलकर, तालुका सहसचिव डॉ.जगदीश पाटील, तालुका कोषाध्यक्ष अॅड.जयश्री देशमुख, तालुका संघटक राजश्री नेवे, तालुका सदस्य मंदार बागुल, अॅड.विक्रम शेळके, अॅड, निलेश भंडारी, विजया पालखे.
