भुसावळातील डॉ.संगीता बियाणी यांचा जयपूरमध्ये सन्मान
भुसावळ : फोरेवर स्टार इंडियाच्या वतीने भुसावळच्या डॉ.संगीता मनोज बियाणी यांना रीयल सुपर वुमन 2022 सीझन 3 चा पुरस्कार देऊन राजस्थान येथील जयपूरमध्ये सन्मानित करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी मिलिटरीचे मेजर जनरल निरज बाली, ब्रिगेडीयर भरतसिंग रावत, कर्नल अजय ध्याणी ,लेफ्टनंट कर्नल मयंक बेबी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी भारतातील 74 विशेष कामगिरी करणार्या महिलांना रीयल सुपर वूमन अवार्ड 2022 सीझन 3 चा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जयपूर येथिल राजेश अग्रवाल यांनी केले होते. यावेळी भारतातील महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, हरीयाणा, राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेशातील महिलांनादेखील सन्मानित करण्यात आले. त्यात जळगाव जिल्ह्यामधून भुसावळातील बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी यांचा समावेश होता.

75 पुरस्कारांनी गौरव
संगीता बियाणी यांना या आधीदेखील 75 विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे .त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे पती उद्योजक मनोज बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रौनक बियाणी, मुस्कान बियाणी, पियुष बियाणी,खुशी बियाणी तसेच त्यांच्या शाळेतील शिक्षक वर्ग व नातेवाईकांनी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ.संगीता मनोज बियाणी ह्या गेल्या कित्येक वर्षापासून बियाणी एज्युकेशन या संस्थेची धुरा सांभाळत आहे. त्यांच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी घडलेले आहेत, तसेच गरीब विद्यार्थ्यांना यांनी स्वखर्चाने शिक्षणासह पालन पोषण केले आहे. डॉ.संगीता मनोज बियाणी यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान पाहता त्याची दखल घेण्यात आली.