बोदवड तालुक्यात पाच ग्रा.पं.वर महाविकास आघाडीचे वर्चस्व
ग्रामपंचायत निवडणूक : निकालानंतर उमेदवारांसह समर्थकांचा जल्लोष : आता गावगाड्याचा विकास होण्याची अपेक्षा
बोदवड : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निकालात महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवल्याचा दावा केला जात आहे. निकालानंतर उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष केला. आता ग्रामपंचायत स्तरावर विकासाची कामे होण्याची अपेक्षा ग्रामस्थांना आहे.
असे आहेत नूतन पदाधिकारी
बोदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीनंतर मंगळवारी निकाल घोषित करण्यात आला. त्यात चिंचखेड प्र.बो.लोकनियुक्त सरपंचपदी आक्काबाई नंदू पाटील या विजयी झाल्या तर सदस्यपदी अलकाबाई दांडगे, विकास नेमाडे, हे उमेदवार विजयी झाले याआधी वत्सला बाई भिल्ल, विद्या नेमाडे, नंदकिशोर सुपे, प्रवीण बारहाते हे सदस्य बिनविरोध झाले होते.

निमखेड सरपंचपदी रमेश सुरंगे
निमखेड ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी रमेश सुरंगे तर सदस्यपदी भाऊराव सदाशीव पाटील हे विजयी झाले. याआधी मनोज शेळके, प्रतिभा पाटील, सविता पाटील, संगीता पाटील, पंजाब वाघ, शोभाबाई वाघ हे सदस्य बिनविरोध झाले होते.
वडजी सरपंचपदी अलकाबाई खाचणे
वडजी ग्रामपंचायतीमध्ये एकाच जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सदस्य पदी किरण खाणे विजयी घोषित झाले. लोकनियुक्त सरपंचपदी अलकाबाई खाचणे यांची निवड झाली असून सदस्यपदी दिलीप पाटील, शिव कन्या कासार, मनिषा पवार, संजय पाटील, मीनाबाई पाटील, सुनंदा भिल्ल हे सर्व बिनविरोध झाले आहेत.
धोंडखेडा सरपंचपदी वैशाली दांडगे
धोडखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली दांडगे या विजयी झाल्या. सदस्यपदी संगीता माहोरे , विक्रमसिंग पाटील, उज्ज्वला पाटील हे उमेदवार विजयी झाले तर ईश्वरसिंग पाटील, सागर दांडगे, विजया दांडगे, रुपाली पाटील हे बिनविरोध झाले.
कोल्हाडी सरपंचपदी पूजाजी पाटील
कोल्हाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी काँग्रेस (आय) युवक तालुका अध्यक्ष पुजाजी पाटील हे लोकनियुक्त सरपंचपदी विजयी झाले तर सदस्यपदी उमेश कवळकर, रीटा मोरे (ईश्वर चिठ्ठीने), योगीता शिंदे, दीपाली राणे, रमा मोरे, रेश्मा सूर्यवंशी, केशव देशमुख, रुपाली लढे हे विजयी झाले. या ग्रामपंचायत निवडणूकीत महा विकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाल्याचा दावा राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.