सावद्यातून 50 हजारांचे पशूधन लांबवले

पशूपालक संकटात :अज्ञात चोरट्यांविरोधात सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


50,000 livestock was extended from savings सावदा : शहरातून 50 हजारांचे पशूधन लांबवण्यात आल्याने पशू पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या परीसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्यासह नाकाबंदी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
शेतकरी निलेश रमेश पाटील (40, प्लॉट एरीया, सावदा) यांनी सावदा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी प्लॉट एरीया भागातील गुरांच्या शेडमधून 50 हजार रुपये किंमतीच्या दोन जर्सी गाय लांबवल्या. हा प्रकार शेतकर्‍याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सावदा पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्याने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मेहमूद शहा करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !