थोरगव्हाण विद्यालयातील धीरज मस्के हॅमर थ्रो प्रकारात प्रथम


Dheeraj Muske of Thoragavan Vidyalaya stood first in hammer throw category थोरगव्हाण : दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण, संचलित डी.एस.देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील धीरज मस्के याने हॅमर थ्रो प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. नाशिक येथे पार पडलेल्या शासकीय विभागीय मैदानी स्पर्धेत प्रकारात बारावी कला शाखेचा धीरज मस्केने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले.

सुवर्णपदकाने सन्मान
त्याच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी आमदार आर.आर.पाटील, सचिव हेमंतराव एकनाथराव चौधरी, सहसचिव रामराव माधवराव देशमुख, संस्था कार्यकारणी सदस्या रजनी रामकृष्णराव पाटील, संस्था सदस्य प्रमोद बळवंत पाटील, मधुकर वना नाले, प्रवीण देविदास पाटील, मुख्याध्यापक एस.एस.वैष्णव, पर्यवेक्षक डी.के.पाटील यांनी अभिनंदन केले. महेश पाटील, क्रीडा अधिकारी महेश पाटील, संदीप ढाकणे, आदिवासी क्रीडा प्रादेशिक क्रीडा मार्गदर्शक संदीप फुगटकर यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, तालुका क्रीडा अधिकारी थोरातब, अ‍ॅथलेटिकचे राजेश जाधव, विजय रोकडे, नितीन पाटील, शेळके यांनी अनमोल सहकार्य केले. विद्यालयातील क्रीडा शिक्षक जे.ए.चौधरी यांनी धिरजचा सराव करून घेतला. लक्ष्मीकांत नेमाडे, सचिन भोळे, वाय.डी.कोष्टी, क्लास टीचर शीतल तायडे यांचे विजयी स्पर्धकांना अनमोल मार्गदर्शन सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !