सावदा भाजपातर्फे जळगाव महापौरांचा निषेध


सावदा : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सभेमध्ये उपमहापौर तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते कुलभूषण पाटील यांनी प्रभू श्री रामचंद्रांपेक्षा रावणाचं उदातीकरण होण्याच्या उद्देशाने अपमान जनक वक्तव्य केल्याचा निषेध भारतीय जनता पार्टी सावदा शहर व तमाम हिंदुत्ववादी विचारांच्या नागरीकांनी केला.

यांची निवेदन देताना उपस्थिती
या संदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कुलभूषण पाटील यांच्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून कुलभूषण पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, माजी नगराध्यक्ष हेमांगी चौधरी, उपाध्यक्ष नितीन खरे, सरचिटणीस संतोष परदेशी, महेश अकोले, सागर चौधरी, अमित महाजन, संजय तेली, गजानन भार्गव, संजय चौधरी, गुणवंत वायकोळे, प्रतीक भारंबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !