विधानसभा व लोकसभा निवडणुका सोबतच होणार ! : मंत्री रावसाहेब दानवेंचा दावा
Assembly and Lok Sabha elections will be held simultaneously! : Minister Raosaheb Danve’s claim औरंगाबाद : लोकसभा व विधानसभा निवडणुका सोबतच होणार असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील परीथिस्ती पाहता केला आहे. या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सत्कार सोहळ्याचे केले विधान
औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केलं आहे. रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे. दानवे यांचे या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून मध्याविधी निवडणूक लागण्याच्या चर्चा सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
