साडेतीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लांबवल्या : धरणगावात भर दिवसा घडली घटना
Gold bangles worth three and a half lakhs were stolen : The incident happened in broad daylight in Dharangaon धरणगाव : कारचालक हॉटेलमध्ये नास्ता करण्यासाठी गेल्याची संधी साधून भामट्याने इनोव्हातून तीन लाख 56 हजार 908 रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लांबवल्याची घटना शहरात भर दिवसा घडल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी धरणगाव पोलिसात बिलाल मोहम्मद वलीद्दीन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नोव्हेंबर महिन्यात घडली घटना
इम्रान शरीफ खान (37, रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारा सते जळगाव येथून नवीन ट्रॅव्हल गाडी घेण्यासाठी सुरतकडे निघाले व त्यांनी खिशात रोख रक्कम व सोन्याचे दागिने गाडीच्या बॉक्समध्ये ठेवत मित्र वसीम अली बशारत अली (रा. तांबापुरा जळगाव) यांच्यासोबत प्रवास सुरू केला. याच दिवशी सकाळी 11 वाजेच्या सुमारास धरणगाव येथे बस स्टॅन्ड समोर हॉटेल जवळ इनोव्हा कार उभी करुन इम्रान खान आपल्या मित्रासह नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर संधी साधून आरोपी बिलाल मोहम्मदने कारचा दरवाजा उघडून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या. इम्रान यांनी संशयीत बिलालचा तीन महिन्यांपर्यंत शोध घेतला मात्र तो न आढळल्याने त्याच्याविरोधात धरणगावत पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहेत.


