श्रमसंस्कार आणि सेवेतून युवा घडतो : डॉ. राजेंद्र फडके

वढोदा महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन


मुक्ताईनगर : श्रमसंस्कार आणि सेवेतून युवा घडत असतो, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र फडके यांनी केले. प.पू.माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था द्वारा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागा द्वारे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दत्तक गाव वढोदा येथे नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत वडोदा गावच्या सरपंच स्वप्ना संदीप खिरोेळकर, उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त सैनिक शक्तिसिंह अर्जुनराव पवार, संस्थाध्यक्ष प्रमोद शिवलकर, उपाध्यक्ष व बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, सचिव भालचंद्र कुलकर्णी, संचालक प्रल्हाद बढे, संचालक प्रभाकर सुशीर, संचालक वासुदेव पाटील, संचालिका गौरी फडके, प्राचार्य सचिन जोशी, प्राचार्य व्ही.एस.चौधरी, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक शत्रुघ्न भोई, गावकरी मंडळी व स्वयंसेवक उपस्थित होते. प्रास्ताविक रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी हेमराज मेतकर यांनी केले. उद्घाटक शक्तीसिंग पवार यांनी युवकांनी देश कार्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी शीतल म्हस्के तर आभार प्रदर्शन प्राचार्य सचिन जोशी यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !