धार्मिक तेढ निर्माण करणार्यास अमळनेर पोलिसांकडून अटक
Arrested by Amalner police for creating religious unrest अमळनेर : एका धर्माच्या जागेवरील भिंत तोडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमळनेर शहरातील मनोज शिंगणे याला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली.
पोलिसात दाखल होता गुन्हा
काही दिवसांपूर्वी एका धर्माच्या जागेवरील भिंत मनोज शिंगाणे व त्याच्या काही सहकार्यांनी तोडली होती शिवाय या प्रकरणी मनोज शिंगाणेवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र संशयीत त्यानंतर पसार झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना संशयीताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे, योगेश महाजन, योगेश पाटील, नम्रता जरे यांनी आरोपीला शनिवारी सकाळी साडेसात वाजता राहत्या घरातून अटक केली.


