भुसावळात अखंड भारत संकल्प दिनानिमित्त उद्या कार्यक्रम


भुसावळ : अखंड भारत दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे 14 ऑगस्ट रोजी अहिल्यादेवी कन्या विद्यालयात सायंकाळी साडेआाठ अखंड भारत दिन संकल्प कार्यक्रम होईल. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असलेतरी त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे 14 ऑगस्टला भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. हा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे दुभंगलेल्या भारताच्या अखंडतेसाठी 14 ऑगस्टला अखंड भारत संकल्प दिनाचा कार्यक्रम सर्वत्र राबविला जातो. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव जिल्हा बाल विद्यार्थी विभाग प्रमुख उमेशजी सोनवणे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. शहर व परिसरातील सर्व राष्ट्रभक्त तरुणांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर संघचालक डॉ. विरेंद्र झांबरे आणि शहर महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख हर्षल भांडारकर यांनी केले आहे.


कॉपी करू नका.