आम्ही भेदभाव करणार नाही मात्र आस्थेशी खेळल्यास खबरदार ! : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा इशारा


We will not discriminate but be careful if you play with interest!: Chief Minister Yogi Adityanath’s warning Don’t play with zeal for conversion: UP Chief Minister Yogi Adityanath जामनेर : सनातन हा मानवता धर्म आहे. सनातन धर्मासोबत छेडखानी केल्यास मानवी जीवनाशी खेळ ठरणार आहे त्यामुळे धर्मांतराचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, हे सहा दिवसांच्या कुंभातून सिद्ध झाले आहे. आम्ही भेदभाव कुणाशीही करणार नाही मात्र आस्थेशी खेळणार्‍यांना कदापित माफ करणार नाही, असा इशारा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे इशारा दिला. गोद्री, ता.जामनेर येथे आयोजित अ.भा.हिंदू गोर बंजारा लभाना व नायकडा समाज मेळाव्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
विचार मंचावर योगगुरु रामदेवबाबा, द्वारकापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंदजी महाराज, रा.स्व.संघाचे माजी, सहकार्यवाह भय्याजी जोशी, आयोजन समितीचे शामचैतन्य महाराज, वृंदावनधामचे गादीपीठ गोपाळचैतन्य महाराज, गोपालबाबा महाराज,बाबुसिंगजी महाराजांसह देशभरातील साधू-संत, महंत तसेच समाज नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

युपीत धर्मांतरविरोधात कायदे कडक
आपल्या आक्रमक शैलीत योगी आदित्यनाथ नाथ म्हणाले की. युपीत कुणीही धर्मांतरण करू शकत नाही तसे केल्यास दहा वर्षांची शिक्षा विाय आधी कुणी केले असल्यास आता त्याला शिक्षा होत आहे. युपीत आता दंगे बंद झाले असून कुणीही गो मातेची हत्या करू शकत नाही तसे केल्यास दहा वर्ष शिक्षेची तरतूद आहे.

तर त्यांना भोग भोगावेच लागतील
देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित म्हणूनच ‘अतिथी देव भव’ हा आमचा स्वभाव गुण आहे त्यामुळे सनातन धर्माच्या मुल्यांचेही जतन होणे अपेक्षित आहे.मात्र धर्माला छेद द्यायला निघाले असतील तर त्यांना भोग भोगावेच लागतील, असा इशारा योगींनी यावेळी दिला.

पुढील वर्षी जानेवारी राम मंदिर पूर्णत्वास येणार
योगी आदित्यनाथ म्हणाले की, पुढील वर्षी प्रभू श्रीरामांचे मंदिराचे मंदिर पूर्णत्वास येणार असून जानेवारी 2023 मध्ये मंदिरात रामलल्लांची मूर्ती स्थापीत होणार आहे.

खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द
गोद्री येथील मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकाच विमानाने सोमवारी एक वाजता विमानाने निघाले मात्र खराब हवामानामुळे विमानाचे उड्डाण शक्य नसल्याने त्यांना आयत्यावेळी दौरा रद्द करावा लागल्याचे आयोजक यावेळी म्हणाले.

 


कॉपी करू नका.