बलात्कार प्रकरणी अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना जन्मठेपेची शिक्षा


Spiritual guru Asaram Bapu sentenced to life imprisonment in rape case अहमदाबाद : बलात्कार प्रकरणात गांधीनगर सत्र न्यायालयाने अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून न्यायालयाने सोमवारी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता.

बलात्कार प्रकरणी ठरवले होते दोषी
गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने 2013 मध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूंना दोषी ठरवले होते. अहमदाबादमधील मोतेरा येथील आश्रमात आसाराम बापूने 2001 ते 2006 दरम्यान महिला शिष्यावर अनेकदा बलात्कार केला. आसाराम बापू यांना कठोर शिक्षा आणि मोठा दंड ठोठावण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. याआधी न्यायालयात सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादात आरोपी आसाराम बापूला जन्मठेपेची मागणी केली होती. तसेच आरोपी हा सवयीचा गुन्हेगार असून त्याच्याकडून भरघोस दंडही ठोठावण्यात यावा, असेही सांगितले. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात आहे, जिथे तो एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

सहा आरोपींची निर्दोष मुक्तता
गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामविरुद्धचा खटला पूर्ण केला आणि त्याला आयपीसीच्या कलम 376, 377, 342, 354, 357 आणि 506 अंतर्गत दोषी ठरवले. महिलेच्या बलात्कार प्रकरणात आसारामची पत्नी लक्ष्मीबेन, त्यांची मुलगी आणि इतर चार शिष्यांसह सहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.


कॉपी करू नका.