यावल रस्त्यावर शेताला आग : दोन लाखांचे नुकसान


यावल : यावल-चोपडा मार्गावरीत एका क्षेतात अचानक लागलेल्या आगीत शेती साहित्य व अवजारे जळुन सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली. शरद वासुदेव यावलकर (यावल) यांचे यावल-चोपडा मार्गावरील शेतात 27 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने शेतातील गोठ्यात ठेवलेली सुमारे सात क्विंटल कापूस, चाळीस ताडपत्र्या, काही पाईप असे एकूण जवळपास दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले. अचानक लागलेल्या या आगीची माहीती शरद यावलकर यांना त्यांच्या शेजारील शेतकरी बांधवांकडुन मिळाल्यानंतर त्यांनी शेतात धाव घेत अन्य शेतकर्‍यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केल तर नंतर यावल नगर परीषदेच्या अग्निशमनच्या बंबाद्वारे आग विझवण्यात आली. शेतात आग कशामुळे लागली की लावण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !