रवीना टंडनसह फराह खान व भारती सिंहवर गुन्हा दाखल करा
भुसावळातील ख्रिस्ती बांधवांचे निवेदन : आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याचा निषेध
भुसावळ : बॅक बेंचर्स या रीआलिटी शो मध्ये 25 डिसेंबर रोजी होस्ट फराह खान, विनोदी अभिनेत्री भारती सिंह व बालिवुड अभिनेत्री रवीना टंडन यांना फराह खान यांनी ‘हालेलुया’ या शब्दाचा अर्थ विचारला असता अत्यंत अश्लिल व घाणेरड्या स्वरुपात या शब्दाचे विश्लेषण करण्यात येवून या शब्दाचा अपमान करण्यात आला. हा शब्द अत्यंत पवित्र बायबलमधील असून त्या पवित्र शब्दाचे अशाप्रकारे विश्लेषण केले गेल्याने भारतातील ख्रिस्ती बांधवांचे ऐन सणासुदीत मन दुखावले गेले आहेत. तिघांवरही भारतीय दंड संहिता 295 ए व 298 प्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भुसावळ शहर पोलिस प्रशासनाकडे शहरातील ख्रिस्ती समाजबांधवांनी शहरातील विविध चर्चमधील पास्टर व पंचांच्या नेतृत्वात केली.
ख्रिस्ती बांधवांच्या सणासुदीत भावना दुखावल्या
फराह खान यांना ‘हालेलुया’ या शब्दाचा अर्थ माहित असतानाही जाणून बुजून भारती सिंगने पवित्र शब्दाचा अत्यंत चुकीच्या पद्धत्तीने विपरीत व घाणेरडा अर्थ लावून तमाम ख्रिस्ती बांधवांच्या भावना ख्रिसमस काळात दुखावल्या आहेत. ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज अनेक मिशनरींनी या भारतासाठी आपले सर्वस्व दिले आहे. पवित्र धर्मग्रंथ बायबल हा आमचा धार्मिक ग्रंथ असून त्याचाही अपमान या ठिकाणी झाल्याने दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी सेंट पॉल चर्चचे प्रिस्ट रेव्ह.किशोर गायकवाड, अलायन्स मराठी चर्चचे प्रिस्ट
रेव्ह स्वप्निल नाशिककर, इम्मानुएल अलायन्स मराठी चर्चचे प्रिस्ट रेव्ह सॅम्युएल गायकवाड, क्राईस्ट चर्चचे प्रिस्ट
रेव्ह.अनिल साळवे व सर्व चर्चेसचे पंच व सर्व सभासद हजर होते.

